मुंबई : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

मात्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं आहे. त्यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केलं पहावं लागेल असंही आदित्य यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, संजय राऊतांची मतं ही वयक्तिक असतात. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस-शिवसेनेची युती कायम आहे. दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. भारतरत्नं कोणाला द्यायचं हे भाजपच्या हातात…त्यांनी द्यावं. मात्र, इतिहासावर किती दिवस बोलणार. इतिहासाकडून शिकावं, प्रेरणा घ्यावी आणि आजचे प्रश्न सोडवावेत. मात्र, सावरकरांसारखे माहापुरुष ही रत्नेच आहेत. त्यांनाही असे वाद पाहून वाईट वाटेल. देशात जे काही सध्या चाललंय ते बघुन महापुरुषांना लाज वाटेल. देशाची अर्थव्यवस्था बघा. देशातील समस्या बघा. त्यावर काम करणं गरजेचं.

कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतो आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा असा सल्लाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता दिला आहे.

 

Web Title:  Environment Minister Aaditya Thackeray says MP Sanjay Rauts comment on Savarkar are Personal.

या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा: आदित्य ठाकरे