1 May 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकेल: भाजप नेते एकनाथ खडसे

BJP Leader Eknath Khadse, Shivsena Congress and NCP Mahavikas Aghadi

पंढरपूर : सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

तत्पूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या २०१४मधील प्रस्तावावर गौप्यस्फोट केला होता त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना २०१४ च्या निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. तेव्हा युती नव्हती. भारतीय जनता पक्षाचं एकट्याच्या जीवावर सरकार स्थापन होतंय असं दिसताना, इतर पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया केली असावी. त्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. सरकार मिळवण्यासाठी किंवा सरकारमध्ये येण्यासाठी असे विविध प्रयोग यापूर्वीही करण्यात आले होते. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य जबाबदार आहे. त्यामध्ये तथ्य असेल. २०१९ मध्ये आम्ही युती म्हणून एकत्र लढलो. तरीही काही टोकाच्या मतभेदामुळे सरकार टिकू शकलं नाही. त्यामुळे आजचं महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं”.

त्यानंतर ते म्हणाले, ‘ आजही शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार आणि तत्व भिन्न असताना भारतीय जनता पक्षाविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार २०१४ मध्येही झाला असावा. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही कारण दोन्ही पक्ष २०१४ मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला होते.

 

Web Title:  Shivsena congress and NCP Mahavikas Aghadi will complete 5 years says BJP Leader Eknath Khadse.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x