3 May 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

महाविकास आघाडीला शंभर दिवस होताच उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार: संजय राऊत

Chief MInister Uddhav Thackeray, Ayodhya Tour, Ram Janma Bhumi

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील”, असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं.

याचबरोबर, प्रभू श्रीरामाची कृपेने महाविकास आघाडीचे सरकार जोरात कामास लागले आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, “सरकार जोरात कामास लागले आहे. ५ वर्षे पूर्ण करणारच!प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील.”

तत्पूर्वी २ नोव्हेंबर २०१८ रोजी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरात होती. निवडणुकीदरम्यान शिवसेना – भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय संबंध देखील ताणले गेले होते. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये युती केल्यानंतर शिवसेना – भारतीय जनता पक्षाला राज्यात मोठं यश मिळालं.

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला प्रचंड यश मिळालं होतं. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. १५ जून २०१९ रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला होता.

 

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya Ram Janma Bhumi again says Shivsena MP Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x