3 May 2024 12:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

राज ठाकरे हे मराठी कलावंतांची आणि मराठी माणसाची 'जाण' असलेले... - संजय नार्वेकर

Raj Thackeray, Sanjay Narvekar

मुंबई: मुंबईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरू आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ असं याचं स्वरूप आहे.

दरम्यान, या महाअधिवेशनात चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि अभिनेते संजय नार्वेकर यांनी सांस्कृतिक महाराष्ट्र हा ठराव मांडला. संजय नार्वेकर यांनी राज ठाकरेंसोबतचा अनुभव व्यक्त केला. राज साहेबांनी मध्यमवर्गातून आलेल्या माझ्यासारख्या अनेक कलावंतांना स्वस्त दरात घरं मिळवित म्हणून पाठपुरावा केला. राज साहेब कायम मराठी कलावंताच्या पाठिशी उभे राहिले. मराठी माणसांसाठी लढणारा त्यांची जाणीव असणारा हा जाणता राजा आहे, अशा शब्दात नार्वेकर यांनी राज ठाकरेंना धन्यवाद दिले. या महाअधिवेशनात संजय नार्वेकरांनी कलाकारांच्या हक्कासाठी अनेक मुद्दे मांडले.

मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा, नाट्यगृहांची अवस्था सुधारणे, प्रायोगिक रंगभूमी जोपासणे आणि मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नार्वेकरांनी सांगितले. याशिवाय गडकिल्ले संवर्धनांसाठीही तत्पर असल्याचे यावेळी नार्वेकरांनी ठरावात मांडले.

संजय नार्वेकर यांनी ‘छत्रपतींची स्मारके असलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करून त्यांचा इतिहास जतन करणे गरजेचं आहे. हा विचार खरंच खूप मोठा आहे. पाश्चिमात्य देशात आपण जेव्हा कला सादर करायला जातो. तेव्हा काही वेळ मिळतो म्हणून आम्ही थोडंफार फिरतो. महाराष्ट्रातला टुमदार बंगला जो तिथे किल्ला म्हणून दाखवला जातो. त्याचा इतिहास फार काही नसतो, थोडाफार असतो. पण त्याचं नाट्यरुपांतर करून तो दाखवला जातो. त्याच्यापेक्षा खूप मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्रात आहे’ असं म्हटलं आहे.

 

Web Title:  Marathi Actor Sanjay Narvekar said MNS Chief Raj Thackray is Janta Raja.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x