2 May 2024 5:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

करोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी; वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल

China Corona Virus, World Health Organisation, Corona Virus Impact

बीजिंग: भारतातील केरळ येथे चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर केरळ आणि भारतातील शहरात दक्षता बाळगण्यात येत आहे. याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल; भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणणार.

चीनमधील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत करा असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चीनमधील भारतीय दूतावासाला केलं आहे. तत्पूर्वी कोरोना व्हायरसचा एक रुग्ण भारतातील केरळमध्ये आढळला होता. या रुग्णावर उपचार सुरु आहेत. परंतु आज एक विशेष विमान चीन मधील वुहान या ठिकाणी रवाना झाले. जे काही वेळापूर्वीच वुहान या ठिकाणी पोहचलं आहे. हे विमान शनिवारी पहाटे सर्व भारतीयांना घेऊन परतणार असल्याची माहिती एअर इंडियचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली.

कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना काढण्यासाठी तेथे दोन विमाने पाठवण्याची विनंती केंद्र सरकारने चीनकडे केली आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, शुक्रवारी संध्याकाळी एअरलिफ्टिंगची मोहीम सुरू केली जाऊ शकते. वुहान व परिसरातून पहिल्या विमानात भारतीयांना मायदेशी आणले जाईल. दुसऱ्या विमानात हुबेई प्रांतातील भारतीयांना आणले जाणार आहे.

 

Web Title:  China Corona Virus Indian Government sent special plane to China after WHO Health Emergency announcement.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x