11 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव - सविस्तर वृत्त

US Senate, proposes bill, ban on China

वॉशिंग्टन, १३ मे : चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. दरम्यान चीनवर जगभरातून विविध आरोप केले जात आहे. चीनवर मुद्दाम व्हायरस पसरवल्याचा तर कोरोना संदर्भातील माहिती लपवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आता चीनची पोलखोल करणारा एक डेटा लीक झाला आहे. चीननं असा दावा आहे डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आणि तेव्हापासून येथे केवळ ८२ हजार ९१९ कोरोना रुग्ण सापडले. तर, ४ हजार ६३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र विश्लेषकांचा असा संशय आहे की चीनमधील मृतांचा आणि संक्रमितांचा आकडा हा यापेक्षा जास्त आहे.

मात्र आता चिनी सैन्याच्या राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने कोरोना संदर्भातील एक डेटा तयार केला होता. आता हा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे वृत्तपत्र फॉरेन पॉलिसीने हा डेटा प्रसिद्ध केला आहे. या डेटा सेटमध्ये कोरोना विषाणूच्या घटना आणि मृत्यूचे तपशीलवार वर्णन केले आहे. बीजिंगने कोरोना व्हायरस डेटा किती आणि किती लोकसंख्येवर जमा केला याचा उल्लेखही यात केला आहे. या डेटाच्या लीकमुळे चीनचा खोटेपणा जगासमोर आला आहे.

दुसरीकडे, वृत्तसंस्था एएफपीच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. रिपब्लिकन खासदारांनी असा कायदा तयार केला आहे, ज्यामुळे ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळेल. खासदार जिम इनहॉफ यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘या जागतिक साथीला चीनच्या कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरायला हवे, कारण त्यातील त्यांची भूमिका निश्चित केली गेली आहे. चीनने संक्रमणाच्या प्रारंभाच्या काळात जगाला अंधारात ठेवले आणि विश्वासघात केला. चीनच्या या फसवणुकीने जगातील मौल्यवान वेळ आणि जीवन उद्ध्वस्त झाले आहे.’

प्रस्तावित कायद्याला ‘कोविड-१९ अकाउंटबिलिटी बिल’ असे नाव देण्यात आलं आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, अध्यक्ष ट्रम्प यांनी संसदेला ६० दिवसांच्या आत चीनने संक्रमणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे की नाही हे सांगावं लागणार आहे. चीनच्या भूमिकेत संशय आढळल्यास यासंदर्भात संयुक्त राष्ट्र किंवा त्यांच्याशी संबंधित संघटनांना(जसे की डब्ल्यूएचओ) स्वत: चा तपास सुरू करता येणार आहे. कायद्यानुसार ट्रम्प यांनी हे देखील सांगावं लागणार आहे की, चीननं खरंच वुहानमधला तो प्राण्यांचा बाजार बंद केलेला आहे की नाही. हाँगकाँगमध्ये अटक केलेल्या लोकशाही समर्थकांना सोडून दिले आहे.

 

News English Summary: The US Senate has proposed a ban on China. Republican lawmakers have passed legislation that would give Trump the power to ban China.

News English Title: US Senate proposes bill to ban on China News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x