29 April 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

....पण डॉ. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मी जरा जास्त बोलतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

former PM Manmohan Singh, CM Uddhav Thackeray

मुंबई: शिवसेनेच्या सामना या मुखपत्राला दिलेल्या विशेष पहिल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे उत्तरे देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला विशेष मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर उत्तरे दिली आहेत.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुने मित्रपक्ष ते नवे मित्रपक्ष अशा सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपाच्या नैतिकतेवर बोलताना, रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते? नितीशकुमार काय बोलले होते?, असे प्रश्न विचारतानाच, आता बिहारमध्येच त्यांची आपापसात लागलीय, तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवू नका असा टोला भारतीय जनता पक्षाला लगावला. भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला खडेबोल सुनावले.

दरम्यान, देशातील अशा अनेक राजकीय नेत्यांवर ते काही करतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी मुलाखतीत उपस्थित केला आणि त्यात डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव पुढे आलं, ज्यांना त्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं मात्र भारतीय अर्थव्यस्थेतील त्यांचं पंतप्रधान म्हणून योगदान मोठं असल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील अशाच टीकेला सामोरं जावं लागत असल्याच संजय राऊत यांनी विचारताच, मी तुलनेत डॉ. मनमोहन सिंग यांच्या पेक्षा जास्त बोलतो असं उद्धव ठाकरे गमतीने म्हणाले.

 

Web Title:  CM Uddhav Thackeray talked on former PM Manmohan Singh during interview.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x