बेंगळुरू: बेंगळुरूतील एका कार्यक्रमावेळी भाजपचे नेते अनंतकुमार हेगडेंनी महात्मा गांधींबद्दल धक्कादायक वक्तव्य केले. अनंतकुमार हेगडे हे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. स्वातंत्र्यलढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथाकथीत नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरीखुरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे वक्तव्य हेगडे यांनी केले.
BJP’s Anantkumar Hegde calls Gandhi’s freedom struggle a ‘drama’
Read @ANI Story | https://t.co/wKd2sIQg18 pic.twitter.com/9asj9tUBps
— ANI Digital (@ani_digital) February 3, 2020
“त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह ही देखील ढोंगं होती, देशात लोक काँग्रेसला पाठिंबा देताना सांगतात की, त्यांच्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, हे खरं नाही. ब्रिटिशांनी सत्याग्रहामुळे देश सोडलेला नाही,” असंही अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे.
जे लोक काँग्रेसला पाठिंबा देत आहेत ते म्हणतात की आमरण उपोषणामुळे आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र हे खरं नाही. ब्रिटीश सत्याग्रहामुळे भारत सोडून गेले नाही. ब्रिटिशांनी निराशेतून भारताला स्वातंत्र्य दिलं. जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा माझं शरिरातील रक्त खवळतं. आपल्या देशात कसे लोक महात्मा झाले आहेत, असंही हेगडे म्हणाले. दरम्यान, भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाही. त्यांनी याआधी अनेकदा अशी वक्तव्यं दिली आहेत.
Web Title: BJP leader MP Anantkumar Hegde statement on freedom struggle and Mahatma Gandhi.
