पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे उदघाटन झाले. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी याठिकाणी फार फार तर दीड मिनिटं बोलण्यासाठी आलो आहे. आज याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे पालक असायला पाहिजे होते. मी केवळ आणि केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्यामुळे मी पुण्यात आलो आहे. माझं दुसरं कोणतंही काम नाही”.

दरम्यान प्रत्येकाच्या अंगी कुठली ना कुठली कला असते. ती प्रत्येकाने जाेपासली पाहीजे, कारण कलेला कुठलिही डिग्री लागत नाही, असे मत देखील ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्याने खास या कार्यक्रमासाठी पुण्यात कुठलेही काम नसताना मुंबईवरुन आल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट करत आपली कलेप्रतीचे प्रेम दाखवून दिले. यावेळी राज ठाकरे यांनी कार्टूनिस्ट कंबाइनचे संजय मिस्त्री यांना मनसेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिलं. राज ठाकरे म्हणाले, “संजय बरा बोलतो, येतो का पक्षात”

झील इन्स्टिट्यूट पुणे आणि कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इंक अलाइव्ह’ व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, व्यंगचित्रकार चारूहास पंडित, जयेश काटकर उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले “संजय बरा बोलतो, येतो का मनसेत”: सविस्तर वृत्त