15 May 2021 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

कुणाल कामराने यापूर्वीच राज यांच्या मुलाखतीची इच्छा व्यक्त केली होती...पण - वाचा सविस्तर

MNS Chief Raj Thackeray, Stand up Comedian Kunal Kamra

मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावेळी कुणाल कामरा थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचला. यावेळी त्याने राज ठाकरेंना थेट ‘लाच’ देऊ केली आहे. लाचेच्या स्वरुपात त्याने राज ठाकरेंना त्यांच्या आवडीचे मुंबईतील किर्ती कॉलेजजवळील ‘किर्तीचे वडे’ आणले. याबाबत त्याने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कुणाल कामराने राज ठाकरे यांना एक पत्र सुद्धा लिहिले आहे. ते ट्विट केले असून यामध्ये राज ठाकरे यांनी वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. या पत्रात “मी रिसर्च केले आणि यात तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचे समजले म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता खाद्यपदार्थ ‘लाच’ म्हणून देतो आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.” असे कुणाल कामराने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर कुणालने एक ट्विट देखील केलं होतं आणि त्यावर मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी प्रतिक्रिया देताना ‘का नाही’ असं म्हणत एकप्रकारे त्या मुलाखतीसाठी पुढाकार घेण्याचं सूचित केलं होतं. परिणामी कुणालची इच्छा बळावली आणि तो थेट कृष्णकुंज’वर गेला, मात्र त्याची भेट होऊ शकली नाही. अखेर त्याने त्यासंदर्भात एक पत्र देखील दिलं आहे.

वास्तविक कुणाल एक विवादित व्यक्ती आणि कट्टर मोदी विरोधक म्हणून परिचित आहे. अनेक विवादास्पद वाक्यप्रचार थेट कार्यक्रमात करणे त्याच्यासाठी नवं नाही. त्यामुळे उद्या राज ठाकरे यांनी कुणालला मुलाखत दिल्याने , त्यातून नेमकं काय साध्य होणार हा देखील संशोधनाचा विषय आहे. कारण मनसेने सध्या पक्षासाठी भविष्यात फलदायी ठरणाऱ्या विषयवार केंद्रित राहणं गरजेचं आहे. अशा विषयांतून केवळ मस्करीचेच मुद्दे वर येतील ज्याच्या काहीच फायदा होणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी वेळ कुठे खर्ची घालावा आणि कुठे नाही हे देखील भविष्यातील विचार करता निश्चित करणं गरजेचं आहे. कारण कुणाल कामरा हा केवळ समाज माध्यमांवरील ‘कंटेनचा’ भुकेला आहे आणि मनसेने स्वतःला दुसऱ्याचा कन्टेन्ट म्हणून वापर करू न देणे हेच शहाण पनाचं ठरेल असं मत समाज माध्यमांचे तज्ज्ञ मानतात.

 

Web Title:  Stand up Comedian Kunal Kamra gives bribe MNS Chief Raj Thackeray.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x