29 April 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

विश्व हिंदू महासभा अध्यक्ष रणजीत बच्चन हत्या प्रकरणी मुंबईतून एकाला अटक

President of Vishwa Hindu Mahasabha Ranjit Bachchan

लखनौ: विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना गेल्या रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली होती. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं असताना या हत्येप्रकरणातील एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आलं असून पुढील धागेदोरे लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

रणजीत बच्चन हे हजरतगंजच्या ओसीआर इमारतीमध्ये राहत होते. यापूर्वी ते समाजवादी पक्षामध्ये होते. ते त्यांचा भाऊ आशिष श्रीवास्तव सोबत फिरण्यासाठी निघाले होते. परिवर्तन चौकामध्ये ग्लोब पार्कमधून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यापैकी एक गोळी डोक्याला लागल्याने रणजीत यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमध्ये राहणारे रणजीत बच्चन हे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करीत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञांत व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी घातल्या होत्या. त्यामुळे रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता.

तत्पूर्वी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा गळा चिरला होता. नंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या होत्या. यात तिवारी यांचा मृत्यू झाला होता. कमलेश तिवारी यांच्यावर गोळी चालवणारे हल्लेखोर बाईकवरुन आले होते.

 

Web Title:  President of Vishwa Hindu Mahasabha Ranjit Bachchan was shot dead one person arrested in Mumbai.

हॅशटॅग्स

#Mumba(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x