8 May 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

पिंक सिटी जयपूर नाही; हे आहेत शिवसेनेची सत्ता असलेल्या प्रदूषित डोंबिवलीचे रस्ते

Dombivali, Pink Road, Pollution

डोंबिवली: रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असते. परंतु, मंगळवारी एमआयडीसी’तील फेज २ मधील एक रस्त्यावर रासायनिक पदार्थ सांडल्याने तो गुलाबी, लाल रंगाचा झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी उग्र दर्प येत असल्याच्या तसेच डोळे चुरचुरणे यासारखा त्रास झाल्याच्या तक्रारी केल्या. दरम्यान, हे प्रदूषण नसल्याचा दावा कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेने केला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून वायुप्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी खुलेआम सोडून देणे यासारखे प्रकार सुरू असतात. यासंदर्भात तेथील नागरिकांनी वारंवार एमआयडीसी तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडेही तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

डोंबिवली एमआयडीसीमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराचे काम सुरू असताना गटारातून काढलेली माती रस्त्यावर पसरल्याने रस्ते गुलाबी झाले. त्यामुळे डोंबिवलीतील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत तातडीने अहवाल मागवला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणी करत जाब विचारला. तत्पूर्वी डोंबिवलीतील अनेक प्रकारच्या प्रदूषणासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्रं दिलं होतं. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज सामान्य लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

 

Web Title:  Dombivali City pollution converted black roads into pink color road.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x