दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे ‘ओएसडी’ गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेताना सीबीआयने गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोपवरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
माधव यांना चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात तत्काळ घेऊन जाण्यात आले आहे. यासंदर्भात मनिष सिसोदिया यांची भूमिका अजून समोर आलेली नाही. तसेच सीबीआयनेही याबाबत आणखी माहिती देण्यास नकार दिला आहे. माधव हे २०१५ पासून सिसोदियांसोबत काम करत आहेत. दिल्ली निवडणूकांच्या दोन दिवस आधी ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच यामुळे राजकीय आरोपांच्या फैरी पुन्हा एकदा झडणार असे चित्र आहे.
या विषयाला अनुसरून मनिष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, “मला समजले की, एका जीएसटी अधिकाऱ्याला लाच घेताना सीबीआयने अटक केली आहे. हा अधिकारी माझ्या कार्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत होता. सीबीआयने या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या 5 वर्षांत अशा अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मी स्वत: पकडले आहे.”
मुझे पता चला है कि सीबीआई ने एक GST इन्स्पेक्टर को रिश्वत लेते हुए गिरफ़्तार किया है. यह अधिकारी मेरे ऑफ़िस में बतौर OSD भी तैनात था. सीबीआई को उसे तुरंत सख़्त से सख़्त सजा दिलानी चाहिए. ऐसे कई भ्रष्टाचारी अधिकारी मैंने ख़ुद पिछले 5 साल में पकड़वाए है.
— Manish Sisodia (@msisodia) February 7, 2020
दिल्ली विधानसभा निवडणूका उद्या पार पडतील. त्या व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसह ४० हजार जवान या सुरक्षेच्या कामात असतील. तसेच १९ हजार होमगार्ड पोलिसही तैनात असतील.
Web Title: Delhi Deputy CM Manish Sisodia OSD Arrested while taking a bribe.
