5 May 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची 'बी टीम' झाली आहे; मनसेचा टोला

MNS Maha Morcha, Raj Thackeray, Hindutva

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (एनआरसी) यावरून देशभरात प्रचंड वादंग सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.

मनसेचा मोर्चा हा भाजपा पुरस्कृत आहे, त्यामुळे मनसेच्या मोर्चाचा कुठेही शिवसेनेवर परिणाम होणार नाही अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली होती. त्यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत संदीप देशपांडे म्हणाले की, मनसेच्या महामोर्चासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोशल मीडिया असेल वा चौकसभा सर्व माध्यमातून आम्ही लोकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. सकाळी १०.३० वाजता प्रभू रामचंद्राची आरती करून मनसेचे कार्यकर्ते हिंदू जिमखाना, गिरगाव चौपाटी येथे जमा होणार आहे. मनसेच्या मोर्चासाठी फक्त कार्यकर्ते नव्हे तर सर्वसामान्य नागरिक देशभक्त म्हणून सहभागी होत आहे असं त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याने मोर्चा व आझाद मैदानावर होणा-या सभेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दक्ष आहेत. दक्षिण मुंबईतील पोलीस ठाण्यातील पोलिसांबरोबरच विभागीय अधिकारी, अंमलदार, दंगल नियंत्रण पथक, बीडीडीएस, वाहतूक पोलीस, राज्य राखीव दलाच्या जवानांना रविवार सकाळपासून तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय अतिरिक्त ६०० जवानांना पाचारण केले आहे.

मोर्चासाठी दोन ते तीन लाख जण येण्याची शक्यता मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

 

Web Title:  MNS leader Sandeep Deshpande slams Shivsena leader statement over Maha Morcha.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x