18 May 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या
x

शिवसेनेने अबू आझमी'सोबत राहावं; आम्हाला हिंदुत्व शिकवू नये: आ. राजू पाटील

MLA Raju Patil, Shivsena

मुंबई:  मनसेचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता . त्यावर मनसेचे खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण-डोंबिवलीतून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘शिवसेनेनं आपलं बघावं, आम्हांला हिंदुत्व शिकवू नये, तुमचं हिंदुत्व अबू आझमीसोबत सुरु राहूंदेत अशी सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. तर “अजित पवार हे सरकार चालवत असून थोड्या दिवसांनी शिवसेना देखील चालवतील”, अशी खोचक टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर केली आहे.

महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

याबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, देशाच्या व्यवस्थेवर घुसखोरांचा ताण असल्याने जो कोणी देशभक्त आहे ते मनसेचा मोर्चाला सहभागी होऊ शकतात. बाळासाहेब ठाकरेंनी जी आक्रमक भूमिका पाकिस्तानी, बांग्लादेशीविरोधात घेतली होती. मात्र सत्तेच्या हवास्यापोटी शिवसेनेने सोयीस्कररित्या ही भूमिका बाजूला सारली आहे. शिवसैनिकांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मनसेच्या मोर्चाला मिळताना दिसत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेनेची स्पेस मनसे भरुन काढतंय, त्यामुळेच शिवसेनेकडून अशाप्रकारे टीका होत आहे. मनसेने मोर्चाचं नेतृत्व केलं असलं तरी अनेक देशभक्त या मोर्चात सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन मोर्चात लोकांनी सहभाग घेत असतील असं भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

 

Web Title:  MNS MLA Raju Patil slams shivsena Party leader over Hindutva agenda.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x