5 May 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

दिल्ली निवडणुका: भाजपा पिछाडीवर तरी २०१५'च्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत वाढ

Delhi Assembly Election 2020, BJP Vote Percentage

नवी दिल्ली: दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्हाला गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. मतमोजणीआधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून, दिल्लीमध्ये सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मनोज तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळतील असं म्हटलं होतं. पण मतमोजणीला सुरूवात होताच आपने स्पष्ट आघाडी घेतल्याचं समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. यामुळे एकप्रकारे भारतीय जनता पक्षाने पराभव स्वीकारण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टी पिछाडीवर असली तरी २०१५ मधील निवडणुकीच्या तुलनेत या पक्षाने मोठी एकूण मतांमध्ये झेप घेतली आहे. यामध्ये केवळ जागांमध्ये झालेली वाढच नव्हे तर त्यांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांच्या टक्केवारीत देखील वाढ झाली आहे. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ३२ टक्के मतं मिळाली होती. यामध्ये काँग्रेसने सुमारे १० टक्के मतं मिळवली होती तर आम आदमी पार्टीला (आप) सर्वाधिक ५४ टक्के मतं मिळाली होती. या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील ताज्या कलांनुसार, भारतीय जनता पक्षाला ४३ टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. पहिल्या तीन तासांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार हा अंदाज बांधण्यात आला आहे. या वाढत्या मतांच्या वाढीच्या जोरावरच भारतीय जनता पक्ष सुमारे २० जागांवार आघाडीवर आहे. २०१५ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ ३ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

दरम्यान, एका पोस्टरमुळे भारतीय जनता पक्षाने पराभव मान्य केल्याची चर्चा असतानाच दिल्ली भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी मात्र भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. ‘मी निराश नाही. भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस चांगला ठरेल, असा मला आत्मविश्वास आहे. आम्ही सत्तेत येणार आहोत. भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळाल्यास आश्चर्य वाटून देऊ नका,’ अशी प्रतिक्रिया मतमोजणी सुरू होण्याआधी मनोज तिवारी यांनी दिली आहे.

दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाला तर दिल्लीमध्ये त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. ‘दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या ५ वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत’ असं त्यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भारतीय जनता पक्षाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

Web Title:  BJP Party jumps in seats as well as total percentage of votes in Delhi Assembly Election 2020.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x