29 April 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

जाणता राजा! आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९०'वी जयंती

Shiv Jayanti, Chhatrapati Shivaji Maharaj, Shivrai celebration

मुंबई: जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात.

नवी दिल्लीतील शिवजयंतीचं राजदूतांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवभक्तांनी दिल्लीमधल्या शिवजयंती उत्सवला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आलं आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात आलेत.

केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी रोजी सुमारे १११ पेक्षा जास्त विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते हे प्रत्येकांनी कधीही नजरेआड करून चालणार नाही.

 

Web Title: Story Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Shivrai celebration in Maharashtra.

हॅशटॅग्स

#Mahabharat(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x