6 May 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

नागपूर: मशिदीवरील भोंगे बंद करा; सेनेची 'तात्पुरती' भूमिका...मनसेची कायमची आहे

Anil Deshmukh, Ban on loudspeakers in mosques Nagpur Shivsena

नागपूर : परीक्षेच्या काळात मिशिदीवरचे लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात अशी मागणी शिवसेनेच्या युवा नेत्याने केलीय. नागपूर जिल्ह्याचे युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांनी ही मागणी केलीय. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय. त्यात ही मागणी करण्यात आलीय. परीक्षेचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे दिवस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय.

परीक्षेच्या काळात कुटुंबांमध्ये टी.व्ही. आणि रेडिओही बंद ठेवतात. असं असताना दिवसातून ५ वेळा नमाज पठण केलं जातं. त्यामुळे त्याच्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात हे लाऊड स्पिकर्स बंद ठेवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय. राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना या मागणीचं निवदेन दिलंय.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांची ही जुनीच मागणी असल्याचं त्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. औरंगाबाद दौऱ्यावर आलेले असताना राज ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते की, मी कधीच माझी भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकारांना विरोध हा पूर्वीपासूनच होता. त्यांना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. मशिदीवरील भोंगे बंद केले पाहिजेत हा मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करतोय. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता.

तसेच आम्ही फक्त झेंडा बदलला आहे. आमची भूमिका तीच कायम आहे. राजकारणात झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी आम्ही काही केलेले नाही, असे स्पष्ट करत धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.पक्षाचे धोरण आणि झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले होते.

 

Web Title: Story Ban on loudspeakers in mosques Nagpur Shivsena Party leader wrote a letter to home Minister Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x