6 July 2020 4:20 AM
अँप डाउनलोड

स्वतःला कॅबिनेट मंत्रिपद व मुलाला आमदारकी जाहीर न झाल्याने अब्दुल सत्तारांचा राजीनामा

Shivsena Abdul Sattar Resigned

मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं. तसंच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यानं ते नाराज होते, असं सांगण्यात येत आहे.

खातेवाटपावरून महाआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नव्हती. मात्र आता अखेर काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर आज काँग्रेसची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे.

दरम्यान, सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जवाबदारी देण्यात आली असून, खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याचवेळी खोतकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे सत्तार यांच्यासोबत फोनवरून बोलणं करून दिले असल्याची ही बोलले जात आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title:  Shivsena Abdul Sattar Resigned from his post Minister for state from Mahaivkas Aghadi Government.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(886)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x