6 May 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

हिंदुत्वासाठी! देशप्रेमाची!...पण हा फोटो फेब्रुवारी २०१९ मधील आहे: संदीप देशपांडे

MNS Leader Sandeep Deshpande, Shivsena

मुंबई: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि ते पहिल्यांदाच सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेणार आहेत. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी काडीमोड घेत थेट वेगळी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. मात्र त्यानंतर सत्ता चालवताना अनेक अडथळे निर्माण होतं आहेत.

शिवसेनेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा जोमाने रेटने कठीण झालं असून सध्या हिंदुत्वाच्या मुद्यांना बगल देत सत्ता राखणं हाच शिवसेनेकडे उपाय असल्याचं दिसतं. आज जरी शिवसेना देशाच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या भल्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात असं सांगत असली तरी त्यांची आधीचे प्रचारतंत्र त्यांचीच राजकीय अडचण निर्माण करेल असंच चित्र आहे.

त्यामुळे २०१९ मध्ये भाजपसोबत युती करून प्रचार करताना शिवसेनेने अमित शहा यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीचे बॅनर गल्लोगल्ली लावले होते. त्यावरील मुख्य शीर्षक असायचा “हिंदुत्वासाठी – देशप्रेमासाठी” आणि त्यावेळी भाजपसोबत अतूट युती होती. आत प्रश्न हाच निर्माण होतो की, जर भाजपसोबत युती ही “हिंदुत्वासाठी – देशप्रेमासाठी” असं समजावं तर सध्याच्या महाविकास आघाडीचा अर्थ मतदाराने काय काढावा असा प्रश्न निर्माण होतो. त्याचाच धागा पकडून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा २०१९ मधील बॅनर ट्विट करत म्हटलं आहे की, ‘हा फोटो फेब्रुवारी 2020 मधील नाही तर फेब्रुवारी 2019 मधील आहे’

 

Web Title: Story MNS Leader Sandeep Deshpande slams shivsena over 2019 Election Hording reminder.

हॅशटॅग्स

#SandeepDeshpande(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x