भाजपाला राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर घ्यावे; शिवसेना नेत्याची टीका

मुंबई: शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात रविवारी पुन्हा एकदा भर पडली. भाजपाचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसे-भाजपा युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिलं आहे. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं. तसेच नाणारला समर्थन करणाऱ्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची जाहीर सभेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही राऊत म्हणाले. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला आहे.
सभा संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे आणि राज ठाकरे तसेच भाजपवर बोचरी प्रतिक्रिया देखील दिली. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘भाजपाचं दिल्लीत पानीपत झालं आहे. तसेच भाजपाचे खासदार नारायण राणे यांना पक्षात समावेश करुन भाजपाने पनवती लाऊन घेतली असल्याचे सांगत विनायक राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठीच्या प्रश्नावर राज ठाकरेंना भाजपाला सोबत घ्यायचं असे तर घ्यावे, कारण मागचा इतिहास पाहिला तर भाजपाची वाटचाल ही झिरो पर्सेंटकडे चाललेली आहे, असं सांगत विनायक राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.
News English Summery: While interacting with the media after the meeting, Vinayak Raut reacted over MP Narayan Rane and Raj Thackeray as well as BJP. Talking about this, he said, ‘The BJP has fallen in Delhi. Similarly, Vinayak Raut has accused the BJP of taking BJP MP Narayan Rane in the party. Similarly, on the question of meeting Raj Thackeray and BJP leaders, Raj Thackeray should take BJP with him, because from the past history, Vinayak Raut has criticized the BJP, saying that BJP’s allocation is towards Zero Percent.
Web News Title: Story Shivsena leader criticized BJP after MLA Ashish Shelar meet with MNS Chief Raj Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN