13 May 2024 5:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला

Mumbai stock Market, Sensex collapsed, YES Bank crisis

मुंबई: करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारात निरुत्साह असताना, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले त्यामुळे शुक्रवारी बाजार आणखी गडगडला. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिला आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४०० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ४०० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. निफ्टी सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.

रशियाला धडा शिकविण्यासाठी सौदी अरेबियाने तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. कोरोना व्हायरसचा जगातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये वेगाने फैलाव झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर ओपेकने तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला.

ओपेकमध्ये सहभागी आणि इतर देशांनीही जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी याला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी सौदी अरेबियाने रशियाला धडा शिकवण्यासाठी एप्रिलपासून तेल उत्पादन प्रतिदिन एक कोटी बॅरलने वाढविण्याचा निर्णय घेतला. या घटनेशी संबंधित दोन सूत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

 

News English Summery: The stock market has been hit by a crisis on Yes Bank, crude oil prices falling in the international oil market and the triple crisis of the Corona virus. The Bombay Stock Exchange index fell 1,400 points on Monday. The Nifty of the national stock market also fell by over 400 points. The Nifty has reached a seven-month low. Already discouraged in the stock market due to the Corona virus, the RBI imposed sanctions on Yes Bank, further aggravating the market on Friday. Now Saudi Arabia has given a big push to the oil market. Saudi Arabia has launched a war against Russia, a one-time ally. As a result, oil prices have dropped historically.

 

Web News Title: Story Mumbai stock market Sensex collapsed after YES Bank crisis.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x