4 May 2025 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

CAA समर्थनार्थ रॅलीमुळे दिल्ली हिंसाचार घडला असे म्हणता येणार नाही: केंद्रीय गृहमंत्री

Delhi Violence, Union Minister Amit Shah

नवी दिल्ली, ११ मार्च: ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडलं आहे. लोकसभेमध्ये अमित शाह यांनी दिल्लीतल्या हिंसाचारावर भाष्य केलं. दिल्लीतला हिंसाचार हा सुनियोजित कट होता, असा आरोप अमित शाह यांनी केला आहे. दंगल करणारा कोणताच व्यक्ती वाचणार नाही, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.

दिल्लीत नुकत्याच झालेल्या हिंसाचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुठे होते? असा प्रश्न विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला होता. लोकसभेतही तो विचारण्यात आला. यावर आपण या काळात संबंधित भागांना भेटी का दिल्या नाहीत, याचे स्पष्टीकरण शाह यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले.

“दिल्लीत एका मोठ्या पक्षाची रॅली झाली. त्यामध्ये घोषणा दिल्या गेल्या. घर से बाहर निकलो. यह आर या पार की लडाई है… हे तुम्हाला भडकावू भाषण वाटत नाही का?” असं विचारत अमित शाहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या चर्चेला अमित शहा यांनी उत्तर दिलं. सीएएवरून ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत या दंगलीचं लोण पसरलं. एवढ्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. यामुळे ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं.

सीएएवरून ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत दिल्लीत दंगल उसळली. इतक्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. दंगल घडवण्यासाठी ३०० हून अधिक लोक यूपीमधून आले होते. या दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असून याप्रकरणी कारवाई करताना कुठल्याही निष्पापावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचे अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.

 

News English Summery: Union Home Minister Amit Shah said that the properties of the victims of Delhi violence will be confiscated. Not only that, Delhi did not burn due to the rally in support of the CAA, Shah said. The issue of violence in Delhi was discussed in the Lok Sabha today (Wednesday). At this time, the opposition launched a strong attack on the BJP government. Meanwhile, while Amit Shah was speaking, members of Congress witnessed protesting in the House. Amit Shah said that strict action will be taken against those who set fire to the violence in Delhi. Shah said at the time, the property of those who set fire to them will be confiscated. An attempt was made to paint the political violence in Delhi. The unfortunate incident was misrepresented by the protesters. Ever since the revised Citizenship Act came into force, the work of inciting youth in the country has been underway. He also said this time.

 

Web News Title: Story Union Minister Amit Shah talked about Delhi violence in Lok Sabha.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या