30 April 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

मोदी सरकारला १२ फेब्रुवारीपासून राहुल गांधी गांभीर्य सांगत होते...पण ? सविस्तर वृत्त

M Narendra Modi, MP Rahul Gandhi

नवी दिल्ली, २३ मार्च : जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८९ आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील २२ राज्य आणि ८० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. इतकी गंभीरर परिस्थिती असतानाही लोकांनी याचं गांभीर्य ओळखायला हवं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात आज सकाळी ट्विटरवर जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.

दरम्यान, चीननंतर इतर देशात करोनाचा प्रसार सुरू झाला. त्यावेळी काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात मोदी सरकारला सावध केलं होतं. करोनाचं संकट गंभीर असल्याचं त्यांनी मोदी सरकारला सांगितलं होतं. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजी ट्विट करून केंद्र सरकारला सावध होण्याचा इशारा दिला होता.

१२ फेब्रुवारीचं ट्विट

३ मार्चचं ट्विट

५ मार्च रोजी केलेलं ट्विट

 

News English Summery:  After China, the spread of corona to other countries began. At that time, Congress leader Rahul Gandhi had warned the Modi government in this regard. He had told the Modi government that the Karona crisis was serious. On February 12, Rahul Gandhi tweeted, warning the central government to be cautious. ‘Karo is a serious threat to the people of India and the Indian economy. It seems to me that the central government does not take this risk seriously. Rahul Gandhi has warned that timely measures need to be taken.

 

News English Title: Story Corona virus in India MP Rahul Gandhi warned PM Narendra Modi government about Corona Virus Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x