28 April 2024 9:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

देश लॉकडाऊन; पण मुख्यमंत्री आदित्यनाथांनी गर्दीसह देवीचं दर्शन घेतलं

CM Yogi Adityanath, PM Narendra Modi, Corona Crisis, India Lock Down

अयोध्या, २४ मार्च: देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यावाचून कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच मंगळवारी मध्यरात्रीपासून घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. २१ दिवस हे निर्बंध लागू असतील. देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी ही घोषणा केली.

आपलं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका असं तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी सांगतो आहे असंही ते म्हणाले. ज्या देशांनी अशा प्रकारचे उपाय योजले त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

त्यानंतर बुधवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला पोहचले. अयोध्येत प्रभू रामाची मूर्ती टेंटमधून हटवून तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आली. राम मंदिराच्या निर्माणानंतर रामाची मूर्ती त्याठिकाणी स्थापित केली जाईल. यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टीका केली. उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे.

उत्तरप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी सांगितले की, नवरात्रीचा पहिला दिवस आहे. देवीच्या दर्शनाला जाण्याची माझीही इच्छा होती. पण पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्याचं पालन करायला हवं. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांचे ऐकत नाहीत. आदित्यनाथ यांनी गर्दीसह देवीचं दर्शन घेतलं मग उत्तर प्रदेशातील जनता पंतप्रधानांचे का ऐकेल? असा सवाल त्यांनी केला आहे.

 

News English Summery: On the first day of Navratri on Wednesday, Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath reached Ayodhya. In Ayodhya, the idol of Lord Rama was removed from the tent and placed in a temporary temple. After the construction of the Ram temple, an idol of Rama will be installed there. Other Opposition parties, including the Congress, criticized the visit of the UP Chief Minister. The number of corona virus patients has reached 35 in the north. Uttar Pradesh state Congress chief Ajaykumar Lallu said that it was the first day of Navratri. I also wanted to go to the Goddess Darshan. But the Prime Minister has announced a lockdown as stated. Therefore, they should be followed. But Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath does not listen to the Prime Minister. Adityanath saw the Goddess with a crowd, so why would the people of Uttar Pradesh listen to the Prime Minister? They have questioned that.

 

News English Title:  Story corona virus CM Yogi Adityanath does not listen PM Narendra Modi so why should public listen says congress News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x