....अन्यथा पुढच्या पिढीलाही याची मोठी किंमत मोजावी लागेल; पवारांचा इशारा

मुंबई, ३० मार्च : राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह द्वारे लोकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लोकांना घरातच राहण्याचं आणि कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच यावेळी शरद पवार यांनी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिली.
यावेळी शरद पवार यांनी मनोबल वाढवतानाच करोनाच्या आजारामुळे देशावर घोंगावत असलेल्या संकटाची जाणीव करून दिली. ‘करोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचं पालन करा. करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठं आहे. जर सूचनाचं पालन केलं नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा पवार यांनी जनतेला दिला.
तसेच त्यांनी डॉक्टर, पोलिस, प्रशासन आदींचे आभार मानले. तसेच खासगी डॉक्टरांनी संकट काळात दवाखाने बंद ठेवणे गंभीर बाब असल्याचे म्हटले. वैद्यकीय सेवा देण्याचे काम थांबवू नका, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारची भूमिका समंजसपणाची आहे. याचा अर्थ दुबळेपणा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या चुकीचा परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागेल. त्यामुळे प्रत्येकाने अवश्य ती काळजी घ्यावी.
येत्या काळात ओढवू शकणाऱ्या आर्थिक संकटाबद्दलही पवारांनी आपले विचार मांडले. ‘करोनाच्या संकटामुळं आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. त्या अनुभवातून आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे, असं ते म्हणाले. ‘करोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योगधंदे, शेती, कारखाने, व्यापार सगळं बंद आहे. याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्थेचा विकासदर पुढील काळात अगदी २ टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचा विचार आपण आतापासूनच करायला हवा असं देखील पवारांनी सांगितलं आहे.
News English Summary: NCP President Sharad Pawar has once again interacted with the people through Facebook Live in the face of the increasing influence of Corona in the state and in the country. This time, he urged people to stay indoors and take proper care of Corona. Sharad Pawar also answered the questions asked by the people at this time. At this time, Sharad Pawar, while raising the morale, informed about the distress which is affecting the country due to coronary disease. ‘We are about to win the Corona. But, follow the instructions from the government. The growing number of Corona patients is alarming. So stay home. Don’t allow time for police action. This crisis is big. If the instructions are not followed then we will have to pay the cost to the next generation as well, ”Pawar warned the public.
News English Title: Story NCP President Sharad Pawar Facebook LIVE over Corona Crisis Covid 19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL