3 May 2025 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन'मुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम; या देशाने वापर थांबवला

Covid19, Corona Crisis, France

पॅरिस, १० एप्रिल : सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. २०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे.

दरम्यान, भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

मात्र अमेरिका व इतर देशांमध्ये मलेरियाच्या आजारावर वापरण्यात येणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधांची मागणी होत असताना फ्रान्समधील एका रुग्णालयाने या औषधाचा वापर थांबवला आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

फ्रान्समधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सेंटर ऑफ नाइसने हा निर्णय घेतला आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांचा वापर करण्यात येत आहे. २२ मार्चपासून या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर या औषधांचे चार वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचाही समावेश होता.

 

News English Summary: A hospital in France has stopped using the drug while demanding hydroxychloroquine is used in malaria cases in the United States and other countries. This decision has been taken as the drug is affecting the hearts of the patients. The decision was made by the University Hospital Center of Nice in France. It is reported that the decision was taken as the drug is affecting the heart of the patients. Currently, hydroxychloroquine drugs are being used on coroners in hospitals. From March 22, four different experiments were conducted on this coronary hospital in this hospital. They also included hydroxychloroquine.

News English Title: Story corona virus France has stopped treating corona patients hydroxychloroquine Covid19 News latest Updates

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या