सरकारची नियमावली...हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन ५ वर्षांखालील मुलांना आणि या रुग्णांसाठी नाही
नवी दिल्ली, १० एप्रिल : भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
मात्र अमेरिका व इतर देशांमध्ये मलेरियाच्या आजारावर वापरण्यात येणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधांची मागणी होत असताना फ्रान्समधील एका रुग्णालयाने या औषधाचा वापर थांबवला आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्समधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सेंटर ऑफ नाइसने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर कसा करायचा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नियमावली जारी केली आहे. यामध्ये कोणत्या रुग्णांना हे औषध देऊ नये, याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नेमलेल्या कृतीगटाने अभ्यास करून ही नियमावली तयार केली आहे. सध्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येत आहे. चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार हे औषध उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले होते. हे औषध १५ वर्षांखालील मुलांना देऊ नये, असे नव्या नियमावलीत म्हटले आहे. त्याचबरोबर रेटिनोपथी आणि हायपरसेन्सिटिव्हीटी असणाऱ्या रुग्णांनाही हे औषध देऊ नये, असे सूचविण्यात आले आहे.
News English Summary: Meanwhile, the Union Ministry of Health has issued a guideline on how to use hydroxychloroquine to treat coronary infected patients. It also provides information on which patients should not be given this medicine. The rule has been prepared by a study conducted by the Indian Council of Medical Research. Currently, the drug is being given hydroxychloroquine to cure coronary infected patients early. Research in China has shown that the drug is useful. The new rule states that the drug should not be given to children under 5 years of age. It is also advised not to give this medicine to patients with retinopathy and hypersensitivity.
News English Title: Story in advisory Indian government lists who should not use Hydroxychloroquine for Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट