9 May 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान? Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल
x

मुंबईत कोरोनाचे ३५७ नवे रुग्ण, संख्या ४ हजार ५०० च्या वर

Covid 19, Corona Crisis

मुंबई, २४ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच असून आज दिवसभरात करोनाचे ३९४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर १८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता ६ हजार ८१७ इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ३१० वर पोहचला आहे. दरम्यान, दिलासा देणारी बाबत म्हणजे रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत असून आतापर्यंत ९५७ पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ज्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी सात रुग्णांना इतर गंभीर आजाराची हिस्ट्री होती. ११ मृत रुग्णांपैकी सात पुरुष तर चार महिला होत्या. या ११ मृत्यूंपैकी एक मृत्यू ८० वर्षांच्या वरील रुग्णाचा होता. तर एक मृत्यू ४० वर्षांखालील रुग्णाचा होता. इतर नऊ मृत्यू हे ४० ते ६० या वयोगटातील रुग्णांचे होते असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंग यांना संमती मिळाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सगळ्या राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. त्याच व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्राने मान्यता दिली आहे.

 

News English Summary: In Maharashtra, the prevalence of corona is on the rise, with 394 new cases of corona found today, while 18 patients have lost their lives due to corona. The total number of coronary heart disease patients in the state has now reached 6,817 and the total death toll has reached 310. Meanwhile, it is reassuring that the rate of coronary heart disease is increasing and so far 957 have fully recovered and returned home.

News English Title: Story Maharashtra state 357 New Covid19 Cases 11 Deaths Have Been Reported In Mumbai Today Taking The Total Number Of Cases To 4589.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x