14 December 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

वाईनशॉप खुले करण्यामागे नक्की महसुलाचाच विचार? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाचा

Saamana Newspaper, Raj Thackeray, Shivsena

मुंबई, २५ एप्रिल: टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

राज यांच्या मागणीत दम आहे व त्यांनी अनेक जिवांच्या कोरड्या घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे. त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, असं सांगतानाच पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली?, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठया वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱया जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. राज ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. त्यांनी पोळी-भाजी केंद्र व दारू दुकाने सुरू करा असे एकाचवेळी सांगितले, पण दारू (दवा-दारू म्हणा) पोळी-भाजीप्रमाणे जीवनावश्यक वस्तू असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. मोठा वर्ग ज्याप्रमाणे ‘राईस-प्लेट’वर अवलंबून आहे तितकाच तो ‘क्वार्टर’, ‘पेग’वरही अवलंबून असल्याची बहुमोल माहिती सरकारसमोर मांडली आहे असाही टोला शिवसेनेने राज यांना लगावला.

राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर, असं म्हणत शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्या मागणीवर भाष्य केलं आहे.

 

News English Summary: The blockade has crippled the economy. Therefore, there is a need for revenue to run the state and the sale of liquor should be considered following the rules, demanded Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray in a letter to the Chief Minister. Shiv Sena has now raised the issue. Raj Thackeray’s demand for colorful music is exactly the idea behind the state’s revenue, isn’t it? Or did the MNS chief make this shocking demand out of concern for the dry throat of ‘Taliram’? Saying this, Shiv Sena has raised question marks on their demand.

News English Title: Story shivsena Saamana Newspaper criticize MNS Chief Raj Thackeray over his demand to start liquor shops in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x