14 May 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

राज्यात कोरोनाचे ५९७ नवे रुग्ण, २४ तासात ३२ मृत्यू, आकडा ९,९०० च्याही पुढे

covid 19, Corona crisis, Maharashtra

मुंबई, २९ एप्रिल: राज्यात नव्याने आढळलेल्या ५९७ नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ९१५ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत ३१ नव्या रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यात मुंबईतील २६ रुग्णांसह पुण्यातील ३, सोलापूर आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. राज्यातील मृत्यांचा आकडा हा ४३२ इतका झालाय. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत असून त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूरमधील मालेगावातही रुग्णांचा आकडा वाढतानाचे चित्र आहे.

आकडेवारीनुसार राज्यात ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईत २६, पुणे शहरात ३, सोलापूरमध्ये १ औरंगाबादमध्ये १ आणि पनवेलमध्ये १ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये २५ पुरुष तर ७ महिला आहेत. ३२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे १७ रुग्ण आहेत. तर १५ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले आहेत. मृत्यू झालेल्या ३२ पैकी १८ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले. कोविड १९ मुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कालच्या तुलनेत राज्यात करोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट पाहायला मिळाली. मंगळवारी राज्यात करोनाचे ७२९ नवीन रुग्ण आढळले होते. त्याजागी आज करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले. हाच कायतो दिलासा म्हणता येईल.

 

News English Summary: The number of coronary heart disease cases has reached 9,915 with 597 newly diagnosed patients in the state. In the last 24 hours, 31 new patients lost their lives due to corona. This includes 26 patients from Mumbai, 3 from Pune, one each from Solapur and Aurangabad. The death toll in the state has risen to 432. Mumbai has the highest number of patients on a daily basis, followed by Malegaon in Pune and Nagpur.

News English Title: Story Covid 19 597 cases registered today Maharashtra States case count reached to 9915 Death toll of the state 432 on till date News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x