27 April 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

MLC CM Uddhav Thackeray

मुंबई, १८ मे: कोरोना व्हायरसचे संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील राजकीय संकटावर पडदा पडला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून निवडीचे पत्र स्वीकाराले आणि सदस्यत्वाची शपथही घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचले. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य निवडीचे पत्र स्वीकारले. त्यानंतर छोटेखानी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांनीही शपथ घेतली.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली होती.

शपथ घेणारे सदस्य
शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे
भाजप – गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड
राष्ट्रवादी – शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी
काँग्रेस – राजेश राठोड

 

News English Summary: Uddhav Thackeray faced a political crisis as the Assembly elections were held without any opposition. Today, Chief Minister Uddhav Thackeray accepted the letter of selection as a member of the Legislative Council and also took the oath of membership.

News English Title: CM Uddhav Thackeray took oath as a member of the legislative council Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x