4 May 2025 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुंबई पोलीस सोमैयांना म्हणाले, तो व्हिडिओ जुना आहे आणि कोरोनाशी संबंध नाही

Kirit Somaiya, Covid 19

मुंबई, २५ मे: मुंबईमध्ये रविवारी एक हजार ७२५ जणांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या ३० हजार ३५९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ९८८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या २५ हजार १३१ इतकी झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या ५९८ जणांना रविवारी घरी पाठवण्यात आले. बरे झाल्यामुळे रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आठ हजार ७४ इतकी झाली आहे. दरम्यान, मुंबईमधील रुग्णवाढीचा दर सर्वसाधारण सरासरी ६.६१ टक्क्यांवर आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दुसरीकडे मुंबईतील भाजपचे नेते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांचीच उलट कोंडी होताना दिसत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या हे ट्विटरवरुन याचसंदर्भात वारंवार राज्यातील महाविकास आघाडीला प्रश्न केला होता. शीवमधील रुग्णालयातील व्हिडिओ असो किंवा एखाद्या घटनेवरील प्रतिक्रिया असो सोमय्या हे ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. मात्र सोमय्या यांनी नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण थेट मुंबई पोलिसांनी दिलं आहे. पोलिसांसंदर्भातील व्हिडिओ हा जुना असल्याचे थेट पोलिसांनी सांगितल्यानंतर सोमय्या यांनी ट्विट डिलीट केलं आहे.

सोमय्या यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे मुंबई पोलिसांनी ट्विटवरुन स्पष्ट केलं आहे. “तुम्ही आमची काळजी करता याबद्दल बरं वाटलं मात्र हा व्हिडिओ १६ मे २०२० चा असून तो करोनाशी संबंधित नाहीय. ही महिला करोनायोद्धा अगदी ठणठणीत असून ती करोनाग्रस्त नाहीय. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की माहितीची खात्री करुन घेतल्याशिवाय ती शेअर करु नये,” असं मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

News English Summary: Mumbai Police has directly explained that a video posted by Somaiya recently is wrong. Somaiya has deleted the tweet after the police directly said that the video was old.

News English Title: Mumbai Police replied to former MP Kirit Somaiya over video shared regarding covid 19 News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या