17 April 2021 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

मुंबईत तुमच्या आहेत त्या जागा वाचवून दाखवा | भाई जगतापांचं भाजपला चॅलेंज

Mumbai Congress President Bhai Jagtap, Devendra Dadanvis

मुंबई, २२ डिसेंबर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जातोय. अशावेळी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली तरी सहकारी पक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत केली जाईल असं देखील स्पष्ट केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काँग्रेस हायकमांडकडून शनिवारी भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर भाईंनी भारतीय जनता पक्षाला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. भाई जगताप यांनी नियुक्ती होताच भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना भाई जगताप यांनी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला खुले आव्हान देत म्हटलं आहे की,’मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या जितक्या जागा आहेत त्या वाचवून दाखवा’ असे थेट आव्हान भाई जगताप यांनी दिले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामूळे भाई जगताप यांच्या या चॅलेंजचे उत्तर भारतीय जनता पक्षाकडून आणि फडणवीस यांच्याकडून काय येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

News English Summary: Speaking to reporters in Mumbai, Bhai Jagtap has openly challenged Fadnavis and the Bharatiya Janata Party (BJP) to “save as many seats as you have in the Mumbai Municipal Corporation elections”. All political parties are preparing for the Mumbai Municipal Corporation elections. So it will be important to see what the North Bharatiya Janata Party and Fadnavis will come up with about this challenge to Bhai Jagtap.

News English Title: Mumbai Congress President Bhai Jagtap to Devendra Dadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Congress(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x