5 May 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

रायगडसाठी १०० कोटीचा तातडीचा निधी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

CM Uddhav Thackeray, Nature Cyclone, Raigad emergency relief Fund

मुंबई, ५ जून: बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अलिबागचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यामुळे तूर्तास तातडीची मदत म्हणून हा निधी जाहीर करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

यावर अधिक महिती देत मुख्यमंत्री म्हणाले, आपण कोणतंही भलंमोठं आर्थिक पॅकेज जाहीर करणार नाही. सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत व्हावी यासाठी १०० कोटींचा निधी दिला जात आहे. तसंच नुकसानीचे पंचनामे केले जात असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागतील. त्यानंतर नुकसान भरपाई दिली जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे इथल्या अनेक घरांचं नुकसान झालं. विजेचे खांब पडले. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

अन्य मुद्दे ;

  • निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव रायगडकरांनी प्रत्यक्षात घेतला.
  • कोकणवासीय भीषण तांडवाला तोंड देत होते.
  • जीवितहानी टाळण्यास प्रशासन यशस्वी
  • रायगडसाठी १०० कोटीचा निधी देतोय
  • नुकसानीच्या पंचनाम्यांना ४ ते ६ दिवस लागतील
  • वादळाचे संकट गेलं तरी कोरोनाचं संकट कायम आहे
  • प्रशासन सतर्क आहे

दुसरीकडे, माजी खासदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना केवळ रायगडला भेट देऊन पळ काढल्याचं म्हटलं आहे. त्यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पण रायगडमध्ये फक्त १/२ ठिकाणी पाहणी करून परत मुंबईत आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीत सुधा अनेक गावं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालय पण ती पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही… अजून घ्या शिवसेनेला डोक्यावर.”

 

News English Summary: Many talukas in Raigad district were badly affected by the ‘Nature Cyclone’ that hit Maharashtra on Wednesday. Against this backdrop, Chief Minister Uddhav Thackeray has announced a fund of Rs 100 crore for Raigad district as an emergency relief.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray has announced a fund of Rs 100 crore for Raigad district as an emergency relief News latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x