5 May 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम
x

मजुरांसाठी ट्रेन सोडली सरकारने, 'टाटा' करून श्रेय लाटायला आला, पोलिसांनी रोखलं

Sonu Sood

मुंबई, ९ जून : काल महाराष्ट्रनामा न्यूजने संपूर्ण सोनू सूद प्रकरणावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सोनू सूद प्रकरणात बोलताना, राज्य सरकार काही करत नसून केवळ सोनू सूद सर्व मजुरांना मदत करत असल्याची हवा निर्माण केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पोलिसांची प्रचंड मेहनत या प्रकरणात झाकून केवळ सोनू सूदला प्रमोट केल्याचा आरोप सुरु आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य असल्याचं देखील पोलिसांनी महाराष्ट्रनामा न्यूजच्या टीमला सांगितलं होतं. म्हणजे यापूर्वी देखील ज्या ट्रेन्स राज्य सरकारने मजुरांसाठी सोडल्या होत्या, त्यात देखील सोनू सूद रेल्वे स्थानकावर दाखल व्हायचा आणि मजुरांशी संवाद करायचा आणि ट्रेन सुटताच टाटा-बायबाय करण्यासाठी यायचा आणि त्यानंतर तेच व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल व्हायचे.

कोणती ट्रेन कुठल्या स्थानकावरून सुटणार याची माहिती देणारी एक यंत्रणा त्याला मदत करत असल्याचा देखील संशय आहे. त्यामुळे त्याचा हेतू देखील समोर येताना दिसत आहे, ज्याची सध्या सामान्यांना देखील माहिती नाही. त्यात त्याने नेमके स्वखर्चाने किती मजुरांना त्यांचा राज्यात पाठवलं याबाबत निरनिरळ्या माध्यमांनी वेगवेगळी आकडेवारी दिली आहे.

मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या पीआर मॅनेजमेंटमुळे अभिनेता सोनू सूद हा अगदी ‘देवदूत’ ठरलेला आहे. अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत मजुरांना आपापल्या गावी, घरी सोडलं आहे. मात्र काल सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखण्यात आलं.

सोनू सूद आतापर्यंत अनेक मजुरांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांची भेट घेत होता. पण सोमवारी पहिल्यांदाच सोनू सूदला आरपीएफ जवानांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखलं आहे. सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या मजुरांची सोनू सूद भेट घ्यायला गेला होता. मात्र तेथे जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे सोनूने त्यांना बाहेरूनच निरोप दिला आणि त्यामुळे त्याचा पुढचा प्लॅन फसल्याचे म्हटलं जातं आहे.

 

News English Summary: Due to the large scale PR management, actor Sonu Sood has become an ‘angel’. Actor Sonu Sood has so far left the workers in their respective villages and homes. However, Sonu Sood was stopped by the police from going to Bandra terminals yesterday.

News English Title: Railway Police stops Sonu Sood from meeting departing migrant workers at Bandra terminus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x