30 April 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
x

चिनी कंपनीची महाराष्ट्रात ७६०० कोटींची गुंतवणूक

China Great Wall, Signs MoU, Maharashtra Investment

मुंबई, १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

दरम्यान, चीनमधील आघाडीची कार उत्पादन कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्सने’ (GWM) मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याचे जाहीर केले. यानुसार कंपनी तब्बल 1 बिलियन डॉलरची (जवळपास 7600 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे.

ग्रेट वॉल मोटर्स कंपनीचे भारतातील सहाय्यक संचालक पार्कर शी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र सरकारने या गुंतवणुकीचं समर्थन आणि प्रोजेक्टसाठी सहाय्य केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. एकूण मिळून आम्ही भारतात १ अरब अमेरिकन डॉलर गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे जागतिक स्तरावर उत्पादन, रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट केंद्राचं निर्माण, आयात-निर्यात प्रक्रिया यामुळे ३ हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याची आमची तयारी आहे.

“हा एक अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानासह उत्पादन घेता येणारा एक स्वयंचलित प्रकल्प असेल. एकूणच आम्ही टप्प्याटप्प्याने भारतात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहोत. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाच्या प्रीमियम प्रोडक्ट्सचे उत्पादन, आर अँड डी सेंटर, पुरवठा साखळी तयार करणे आणि टप्प्याटप्प्याने 3 हजारांहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध केला जाईल”, अशी माहिती जीडब्ल्यूएमच्या भारतीय सहाय्यक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्कर शी यांनी सांगितले.

 

News English Summary: Great Wall Motors (GWM), a leading car manufacturer in China, on Tuesday announced a Memorandum of Understanding (MoU) with the state government to start manufacturing in Maharashtra. According to him, the company will invest तब्बल 1 billion (about Rs 7,600 crore).

News English Title: Chinas Great Wall Motor Signs Mou With Maharashtra To Invest 1 Billion Create Jobs In Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x