16 April 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं? IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

झोपाळ्यावर बसून झालं, आता चीनला ‘लाल आँखे’ दाखवा - जितेंद्र आव्हाड

PM Narendra Modi, Minister Jitendra Awhad, India China

मुंबई, १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

चीन सीमेवर शहीद झालेल्या २० जवानांची नावे आज सैन्य जाहीर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनकडून सीमेच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता केवळ लडाखच नाही तर संपूर्ण एलएसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)वर विश्वासघात करत चीनी सैनिकांनी भारतीय जवांनावर हल्ला केल्यानंतर आता चीन चर्चेने तणाव कमी करण्याची गोष्ट बोलू लागला आहे. चीनमधीले एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, चीनी सैनिकांचे प्रवक्त्याने म्हटलं आहे की, ‘भारताने त्यांच्या सैनिकांना सख्तीने रोखलं पाहिजे. चर्चेच्या मार्गावर आलं पाहिजे. ‘यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्य सैनिकांना मारलं असून चीनला धडा शिकवायला पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

“चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचं वृत्त आल्यानंतर सुरुवातीला भारताचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती आली होती. त्यावेळी आव्हाड यांनी हे ट्विट केलं.

 

News English Summary: NCP leader and Housing Minister Jitendra Awhad has targeted the Narendra Modi government at the Center. “China has infiltrated Indian territory and killed its troops and China should learn a lesson,” Awhad said.

News English Title: NCP leader and Housing Minister Jitendra Awhad has targeted the Narendra Modi government at the Center over China Issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x