3 May 2025 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

दिल्ली: आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, अमित शहांसोबतच्या बैठकीला हजेरी लावली होती

Delhi Heath Minister Satyendar Jain, Tests Positive, Covid 19

नवी दिल्ली, १७ जून : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना करोनाची लागण झाली आहे. सत्येंद्र जैन यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण यानंतर त्यांचा ताप वाढला होता. सत्येंद्र जैन यांच्यात करोनाची लक्षणं दिसल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा चाचणी केली असता दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, दिल्लीत वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गा्च्या पार्श्वभूमीवर सत्येंद्र जैन हे आघाडीवर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते सतत बैठकांना उपस्थित राहत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकीलासुद्धा सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.

महत्त्वाची बाब म्हणजे सत्येंद्र जैन यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया उपस्थित असणाऱ्या बैठकीला हजेरी लावली होती. दिल्लीमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित होती.

 

News English Summary: Delhi Health Minister Satyendra Jain has contracted coronavirus. Satyendra Jain’s first report was negative. But after that, his fever had increased. Satyendra Jain had symptoms of corona and the doctors decided to test his corona once again.

News English Title: Delhi Heath Minister Satyendar Jain Tests Positive For Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या