1 May 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
x

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीवरून टीका होताच स्पष्टीकरण प्रसिद्ध

NCP state president jayant patil, Actor Sharad Ponkshe

मुंबई, 24 जून : नथुराम गोडसे नाट्य साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे’ अशा शब्दात जयंत पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.

शरद पोंक्षेच्या भेटीनंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून खुलासा केला आहे. “महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हे देखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं बॅकस्टेज कलाकारांना करोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Actor Sharad Ponkshe, who is playing the role of Nathuram Godse, was present at the NCP program. Finally, NCP state president and state water resources minister Jayant Patil has revealed this.

News English Title: NCP state president and state water resources minister Jayant Patil has revealed statement over Sharad Ponkshe presence News Latest Updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x