5 May 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

मनसेकडून दम मिळताच T-Series कंपनीने पाकिस्तानी गायकाचं गाणं हटवलं

T Series Apology, MNS Amey Khopkar, singer Atif Aslam Song, Youtube

मुंबई, २४ जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचा दरारा कामय असल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे यांची मागणी भारतीय म्युझिक कंपनी T-Series नं मान्य केली आहे. पाकिस्तानी गायक आतिफ असलम यानं गायिलेलं गाणं ‘किंना सोना’ हे T-Series कंपनीच्या यू-ट्यूब चॅनेलवरून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करण्यात येणार नाही, असंही T-Series कंपनीनं राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

यानंतर टी-सीरिजने जाहीर माफी मागितली आहे. टी-सिरिजकडून माफी मागणारं पत्र पाठवण्यात आलेलं असून मनसेने ट्विटरवर शेअर केलं आहे. “हे गाणं आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केलं होतं. त्याला माहिती नसल्याने ही चूक झाली. याबद्दल आम्ही माफी मागतो आणि यापुढे हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही अशी खात्री देतो,” अशी हमी टी-सीरिजने दिली आहे. या पत्रात त्यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची खात्रीही दिली आहे.

दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी देशातील सर्व म्युझिक कंपन्यांना पत्र लिहिलं होतं. पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकारांसोबत काम करायचं नाही, असा इशारा मनसेनं या पत्रातून दिला होता. T-Series नं आतिफ असलमचं गाणे ‘बारिशें’ला सगळ्यात आधी यू-ट्यूबवर Unlist केलं होतं. हे गाणं यू-ट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये होतं.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray’s fear has been seen to be working. Raj Thackeray’s demand has been accepted by Indian music company T-Series. The song ‘Kinna Sona’ sung by Pakistani singer Atif Aslam has been removed from the T-Series company’s YouTube channel.

News English Title: T Series Apology To MNS Over singer Atif Aslam Song On Youtube News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x