चेन्नई : तामिळनाडू मधील जनता कावेरी पाणीवाटपावरून एकवटल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईत डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. परंतु त्याआधीच ट्विटरवर #GoBackModi ट्रेंड ने जोर पकडला आहे.

पंतप्रधानांच्या या तामिळनाडू दौऱ्याचा संपूर्ण राज्यभरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार निषेध केला जात आहे. त्याच्याच प्रत्यय म्हणून #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन तामिळनाडूतील नेटकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. एकूच या प्रतिक्रियांमुळे नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधीच ट्विटरवर #GoBackModi ट्रेंड ने जोर पकडला आहे.

नुकताच सर्वोच्य न्यायालयाने कावेरी पाणी वाटपा प्रकरणात दिलेल्या निकालाने तामिळनाडूवर अन्याय झाल्याची भावना संपूर्ण राज्यात आहे. तामिळनाडूवर अन्याय होण्याला प्रमुख कारण म्हणजे मोदी सरकारने तामिळनाडू राज्याची बाजू न्यायालयात नीट मांडली नाही अशी तेथील जनतेची भावना आहे आणि त्यामुळेच संपूर्ण राज्यात भाजप आणि मोदींविरोधात तीव्र असंतोष वाढताना दिसत आहे आणि त्याचाच हा प्रत्यय असल्याचं बोललं जात आहे.

 

Go back modi hashtag trends on twitter ahead pm modis chennai visit