7 May 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली
x

राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार? - शिवसेनेचा टोला

China 59 apps banned, India, Shivsena

मुंबई, 02 जुलै : भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले. चीन सैनिकांशी झालेल्या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने डिजीटल स्ट्राईक करून चिनी 59 अ‍ॅपवर बंदी आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून डिजीटल स्ट्राईकवर परखड भाष्य केले आहे. ‘ लडाख संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला जी डिजिटल जाग आली आहे ती जाग कायम राहावी. चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी लष्कर या ‘डेटा’चा वापर हिंदुस्थानविरोधात करू शकते, असे आता आपल्या गुप्तचर यंत्रणांनी सरकारला कळविले. म्हणजे आतापर्यंत देशाची गोपनीय माहिती चिन्यांकडे गेलीच आहे. आता झाले गेले गंगेला मिळाले. सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला डिजिटल पद्धतीने घेतला आहे’ असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारने केलेल्या कारवाईचं समर्थन केले आहे.

“अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून आपल्याकडील ‘युजर्स’ची माहिती बेकायदा साठवून हिंदुस्थानबाहेरील सर्व्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी होत्याच. टिकटॉकसारखे चिनी ऍप अश्लीलता व इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते व त्यातून म्हणे अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही टिकटॉक स्टार्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार हा प्रश्नच आहे,” अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.

 

News English Summary: Tensions along the Indo-China border have reverberated across the country. Twenty of our soldiers were killed in clashes with Chinese troops. In response, the Modi government launched a digital strike and banned Chinese 59 apps. Shiv Sena has welcomed this decision taken by Prime Minister Narendra Modi.

News English Title: China 59 apps banned in India Shivsena appreciate PM Narendra Modi action News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x