1 May 2025 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

मोदी सरकारकडून आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज अ‍ॅप लाँच

Prime Minister Narendra Modi, Aatmanirbhar Bharat App, Innovation challenge

नवी दिल्ली, ५ जुलै :  भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढताना दिसत आहे. हा वाढता तणाव पाहता भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकार द्वारे सोमवारी Tiktok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन करण्यात आले आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पाऊल पुढे लाकलं आहे. शनिवारी मोदींनी आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज लाँच केलं आहे.

आत्मानिरभर अ‍ॅप इकोसिस्टम तयार करण्यासाठी मोदींनी टेक कम्युनिटीला पुढे येण्याचे आवाहन केले. भारतात आज मेड इन इंडिया अ‍ॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे GoI_MeitY आणि AIMtoInnovate हे संयुक्तपणे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहे. भारतातील तरुणांकडे मोठ्या प्रमाणात कौशल्य आहे. त्यामुळे मी तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या चॅलेंजमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदींनी LinkedInवर लेखही लिहिला आहे. त्यात त्यांनी या स्पर्धेची विस्तृत माहिती दिली आहे.

आत्मनिर्भर भारत ऍप चॅलेन्ज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत राबवण्यात येणार आहे. हे चॅलेन्ज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबतच अटल इनोव्हेशन मिशनला देखील जोडले गेलं आहे.

 

News English Summary: Modi has launched the Self-Reliant Innovation Challenge. Modi appealed to the tech community to come forward to create a self-reliant app ecosystem. There is great enthusiasm in the technical and startup community in India today to create a Made in India app.

News English Title: Prime Minister Narendra Modi launches Aatmanirbhar Bharat App Innovation challenge News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या