28 April 2024 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

शाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

MNS leader Amit Thackeray, School fee hike, CM Uddhav Thackeray

मुंबई, ७ जुलै : सध्या कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. दरम्यान, शाळांकडून फी संदर्भात पालकांवर प्रचंड दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून देखील यावर कोणताही नियंत्रण किंवा हस्तक्षेप नसल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार दरबारी विषय पोहोचविण्यासाठी पालकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन विषय सविस्तर त्यांच्यासमोर मांडला होता. सदर विषयाला अनुसरून अमित ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यावर गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे.

या पत्रात अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या- आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात. दुर्दैवाने, काही शाळा अपेक्षित समंजसपणा दाखवत नसून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत. गेल्या आठवड्यात अशाच स्वरूपाच्या तक्रारी घेऊन काही पालक मला भेटूनही गेले. आज राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहून “पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसंच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा” अशी मागणी केली.

तसेत काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं जाईल, ज्या पालकांकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांना प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन शाळेची फी भरा असं सांगण्यात येत आहे. हा सगळा प्रकार संतापजनक असून पालकांवर अन्याय करणारा आहे. गेल्या काही दिवसांत मनसेकडे अशा अनेक पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. ८ मेच्या निर्णयाविरोधात खासगी शाळा उच्च न्यायालयात गेल्यावर राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. या पुढच्या सुनावणीत पालकांच्या बाजूने राज्य सरकारने ठामपणे उभे राहण्याची भूमिका घ्यावी असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत या प्रकरणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत तरी शाळांनी फी वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नये, या दृष्टीने शासनाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. फी भरण्यासाठी पालकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

 

News English Summary: In the letter, Amit Thackeray said, “During the Corona crisis, schools, especially English medium schools – ICSE, CBSE, IB board schools – need to understand the financial difficulties parents face in paying fees.

News English Title: MNS leader Amit Thackeray initiative against school fee hike wrote letter to CM Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x