4 May 2025 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

युजीसीच्या निर्णयाविरुद्ध आदित्य ठाकरेंची टीका, राहुल गांधींचाही विरोध

Environment Minister Aaditya Thackeray, UGC Decision, Final Year Exams

मुंबई, १० जुलै : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

मात्र महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काल अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं आहे की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली आहे.

“केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सर्व सरकारी यंत्रणा करोनाचा प्रसार होणार नाही, रुग्णसंख्या कमी होईल याची काळजी घेत असताना, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि UGC बरोबर याच्या विरुद्ध वागतंय. महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांना याआधीच्या कामगिरीवरुन मार्क देण्याचा निर्णय घेतला. पण UGC मध्ये बसलेल्या लोकांनी घेतलेला हा निर्णय खूप चुकीचा आहे. लाखो विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या तब्येतीचा प्रश्न असल्यामुळे हा आत्मसन्मानाचा मुद्दा बनवला जाऊ नये”, असं आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.

 

News English Summary: This decision taken by the people sitting in the UGC is very wrong. This should not be made an issue of self-esteem as it is a matter of health of millions of students, teachers and other staff, ”Aaditya Thackeray said on his Twitter handle.

News English Title: Environment Minister Aaditya Thackeray Shows His Displeasure On UGC Decision News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या