19 May 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

राजकारणात कुणी कुणाचा गुरु नसतो, केवळ स्वतःच्या सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या जातात

PM Narendra Modi, Guru Sharad Pawar, MP Sanjay Raut

मुंबई, १२ जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेत ‘शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहे’ असं जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर मोदींनी अनेक सभेत याचा दाखलाही दिला. पण, पहिल्यांदाच शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचे वक्तव्य खोडून काढले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. पहिल्या भागानंतर आज दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपला टोला लगावला. संजय राऊतांनी प्रश्न विचारला की ‘आपण मोदींचे गुरू आहात असे ते म्हणतात. अशा वेळी आपण आपल्या शिष्याला हे सांगायला हवं की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतील?’

याबाबत शरद पवार म्हणाले की, मी नरेंद्र मोदींचा गुरु आहे असं सांगून त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. राजकरणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच देशाला एका मनमोहन सिंग यांची गरज आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारताच शरद पवार म्हणाले, “होय १०० टक्के गरज आहे. मनमोहन सिंग ज्यावेळी आपल्या देशाचे अर्थमंत्री होते तेव्हा मी त्या मंत्रिमंडळात होतो. तेव्हाही देशापुढे आर्थिक अडचणी आल्या होत्या. अर्थव्यवस्था ढासळली होती. मात्र मनमोहन सिंग यांनी त्या संकटातून मार्ग काढला. त्यांच्या इतकंच पी.व्ही. नरसिंहराव यांचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी यासंदर्भातले निर्णय घेतले.” अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

 

News English Summary: Don’t get him in trouble by saying that I am Narendra Modi’s guru and don’t get me in trouble. In politics, no one has a guru, we people play a convenient role in each other’s context.

News English Title: PM Narendra Modi Considers You A Guru Sharad Pawar Laughed At This News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x