14 May 2025 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

महाराष्ट्राचा फंड त्यांनी दिल्लीत दिल्यामुळे ते दिल्लीत भेटी देतात – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Delhi visit, Saamana Newspaper

मुंबई, २५ जुलै : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भातील माहिती वरिष्ठ नेत्यांना देणाऱ्या फडणवीस यांच्याकडून आपण सल्ला आणि सूचना मागवल्या होत्या असं मुख्यमंत्री म्हणाले. “त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात,” असा टोलाही उद्धव यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे ठाकरे शैलीतील फटकारे लगावले आहेत.

मात्र, फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तसेच राज्य सरकार मुंबईतील कोरोनाची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी फटकारले. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या वृत्तपत्रांमध्ये धारावी पॅटर्नचे कौतुक करण्यात आले आहे. तरीही विरोधी पक्षनेते सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप करतात. कदाचित त्यांच्याकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वैगेरे येत नसेल. नाहीतर आम्ही ‘वॉशिंग्टन पोस्ट’ही मॅनेज केलंय, अशी मिष्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

 

News English Summary: I am not worried about what Fadnavis is doing in Delhi. As long as the people believe in me, I am not worried. The rest of Fadnavis will keep talking. He may have a stomach ache that, without going anywhere, an organization selected the Chief Minister of Maharashtra as one of the best Chief Ministers in the country.

News English Title: CM Uddhav Thackeray slams opposition leader Devendra Fadnavis over his Delhi visit News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या