29 April 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

राज्यात आज ९२५१ कोरोना रुग्णांची नोंद, २५७ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid19

मुंबई २५ जुलै: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी ९२५१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या ८ ते १० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर आज २५७ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३६६३६८ एवढी झाली आहे. तर १३३८९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत १०८० रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या १०८०६० एवढी झाली आहे. तर आज ७ हजार २२७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

राज्यात आत्तापर्यंत २ लाख ७ हजार १९४ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५५.५६ एवढं झालं आहे. देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे.

आज मुंबईत १ हजार ९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आता आता १ लाख ७ हजार ९८१ इतकी झाली आहे. त्यापैकी ७८ हजार ८७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

News English Summary: Even today, the number of corona patients in the state has increased to 9251 patients. In the last few days, the number of patients has been steadily increasing between 8,000 and 10,000 per day. Today, 257 patients have died.

News English Title: Maharashtra reports 9251 new COVID19 cases and 257 deaths today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x