27 April 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
x

नाणार जमीन 'कोकणी' लोकांच्या, पण शेतकरी 'गुजराती'

नाणार : रत्नागिरीमधील नाणार मध्ये रिफायनरी प्रकल्प येणार या खबरीनेच केवळ आठ महिन्यात ५५९ एकर जमिनींवर व्यापाऱ्यांनी ताबा मिळवला आहे. या प्रकल्पात ३ लाख कोटीची गुंतवणूक होणार आहे या खबरीनेच येथील जमिनी कवडीमोल भावाने अनेक व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी केल्या आहेत.

रत्नागिरीमधील नाणार रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सूर करण्यात आली आहे. परंतु फ्री प्रेसने दिलेल्या वृत्ता नुसार एकूण ८६ पैकी ३८ जण व्यापारी असून ते मुलाचे गुजरात मधील व्यापारी असल्याचे उघड झाले आहे. त्यात मुख्यत्वे जी नावं समोर आली आहेत त्यात शहा, मोदी, जैन, झुनझुनवाला, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, केडिया, चंदर, थाववरी, रथी अशी नावं शामिल आहेत.

केवळ २ मी २०१७ ते १९ जानेवारी २०१८ पर्यंत या व्यापाऱ्यांनी ५५९ एकर जमीन खरेदी केली आहे. एकूणच हे सर्व व्यापारी आणि राजकारण्यांच्या साटंलोटं असल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही असा थेट आरोप स्थानिक करत आहेत.

मुळात या व्यापाऱ्यांना या प्रकल्पाची आधीच माहिती कुठून मिळाली आणि इथल्या जमिनी एकदम अचानक खरेदी करायला कशी सुरुवात झाली त्यातूनच हे स्पष्ट होत आहे की, काही राजकारण्यांनी या व्यापाऱ्यांना नाणार मधील होऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती करून दिली आणि गुणवणुकीचा सल्ला दिला. कारण या झटपट गुंतवणुकीत व्यापाऱ्यांना २०० टक्के नफा होईल आणि तो देखील ‘सफेद पैसा’ असा थेट आरोपच संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी केला आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांची नावं अजून ‘लँड टायटल’वर त्यांनी थेट स्थानिक प्रशासनाला जमीन अधिग्रहण करण्यासाठी आपण तयार असल्याचं कळवलं आहे यातच सर्व गौडबंगाल समोर येत आहे.

व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या नापीक जमिनीत शेती अशक्य असून त्यांचा शेतजमिनीशी काहीही संबंध नाही असं अशोक वालम म्हणाले. एकूणच जमीन मूळ कोकणवासीयांची परंतु खबर मात्र गुजरात्यांकडे ती सुद्धा ‘नापीक’ जमिनीत गुंतवणूक म्हणजे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आणि मिलीभगत असल्याचं उघड होत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x